नितेश राणेंना गुंडगिरी भोवली, पोलिसांनी घेतले ताब्यात

टीम महाराष्ट्र देशा : उप-अभियंत्याच्या डोक्यावर चिखलाचे पाणी ओतून केलेले आंदोलन नितेश राणे यांना चांगलेच भोवल्याचे दिसत आहे. उप-अभियंत्यावर चिखल फेकल्या प्रकरणी नितेश राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरीत खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होते. दरम्यान या विरोधात नितेश राणे यांनी उप-अभियंत्याला गडनदी पुलावर बांधून त्यांच्या डोक्यावर चिखलाचे पाणी टाकत आंदोलन केले.

दरम्यान उप-अभियंत्याने या सर्व प्रकारानंतर पोलिसात धाव घेत नितेश राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच कारवाई करत पोलिसांनी नितेश राणे यांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे नितेश राणे यांना पोलीस ताब्यात घेण्यासाठी गेले असता राणेंनी प्रचंड गोंधळ घातल्याचे समोर आले आहे.