‘याला सत्तेचा माज म्हणतात’, नितेश राणे राष्ट्रवादी काँग्रेसवर संतापले

मुंबई : हिंगोलीतील वसमत शहरातील बहुप्रतिक्षीत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुधवारी अखेर वसमत शहरात दाखल झाला. तेव्हा हा पुतळा ट्रकमध्ये असल्यामुळे वसमत विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनी अश्वावर उभे राहून छत्रपती शिवाजी महाराज यांना हार अर्पण केला आहे. हा व्हिडीओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि आमदार नवघरे यांच्यावर टीका झाली आहे.

आमदार नवघरे यांच्या या कृतीमुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या या कृत्याचा निषेध व्यक्त होतोय. तर राजकीय क्षेत्रामधूनही त्यांच्यावर टीकेटी झोड उठवण्यात येत आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी नवघरे यांच्या या कृत्याचा निषेध करत घणाघाती टीका केली आहे. ‘याला सत्तेचा माज म्हणतात!! हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत’ असे ट्विट करत राणे यांनी संताप व्यक्त केला आहे.

तर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनीही या मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. महाराजांच्या घोड्यावर बसण्याचा ‘गाढव’पणा करणाऱ्यांवर बाबर सेना काय करणार असा सवाल सदाभाऊंनी विचारला आहे. ‘महाराजांच्या घोड्यावर बसण्याचा ‘गाढव’ पणा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ‘राजू नवघरे’ यांच्या या कृत्यानंतर मग आता बाबर सेना काय करणार. राष्ट्रवादीच्या आमदाराला चपलेने मारणार की भवन वर बोलून फुलाचा हार घालणार? असा प्रश्न विचारत या घटनेचा निषेध केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या