fbpx

नारायण राणे विधानसभा कुडाळ-मालवणमधून लढणार; नितेश राणेंची माहिती

टीम महाराष्ट्र देशा : २०१९ ची विधानसभा निवडणूक आता जवळ आली आहे. अशातच २०१४ साली पराभव झालेल्या कुडाळ-मालवणमधून नारायण राणे पुन्हा निवडणूक लढणार आहेत अशी माहिती नारायण राणेंचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.

नारायण राणे सध्या भाजपच्या पाठींब्याने राज्यसभेत खासदार आहेत. त्यामुळे २०१४ साली विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर नारायण राणे पुन्हा राज्यात येणार का अशी चर्चा रंगली होती. परंतु आता ते कुडाळ-मालवणमधून निवडणूक लढणार असल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान, २०१४ साली शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी राणे यांचा १०५०० मतांनी पराभव केला होता. त्यावेळी राणे कॉंग्रेसमध्ये होते.