fbpx

मराठा क्रांती मोर्च्याची गिनीज बुकमध्ये नोंद करा; आ. नितेश राणेंचे पत्र

nitesh rane maratha kranti morcha

वेबटीम : कॉंग्रेस आमदार नितेश राणे यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्डला पत्र लिहित महाराष्ट्रामध्ये निघत असलेल्या ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्च्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्डमध्ये करण्याची मागणी केली आहे.

उद्या ( दि९) रोजी मुंबईमध्ये निघणारा मराठा क्रांती मोर्च्या हा आजवरच्या इतिहासातील सर्वात जास्त लोकांचा होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याचच चित्र आज संपूर्ण महाराष्ट्रात पहायला मिळत आहे. महाराष्ट्र तसेच देशभरातून जवळपास २५ लाख मराठा बांधव मुंबईमध्ये एकवटनार असल्याचा दावा केला जात आहे. आजवर ५७ मराठा क्रांती मोर्चे निघाले असून उद्याचा मोर्चा हा ५८ वा असणार आहे.

nitesh rane letter to guniess book
नितेश राणेंचे गिनीस बुकला पत्र