मुंबई: राज्यात केंद्रीय तपास यंत्रणा विविध नेते आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर कारवाया करताना दिसत आहेत. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. पाटणकर यांच्या ठाण्यातील ११ सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत. यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “यामध्ये फक्त मेहुणाच आहे का? बायको आणि मुलाचा हस्तक्षेप नाही ना, याच उत्तर जनतेला द्याव लागेल. असं म्हणत या संदर्भात अधिकृत स्टेटमेंट मुख्यमंत्र्यांनी दिल पाहिजे, असेही राणे यावेळी म्हणाले आहेत.
“नंदकिशोर चतुर्वेदी हा कुणाच्या सांगण्यावरुन चालतोय? तो कुणाचा पार्टनर आहे, त्याच्या माध्यमातून हवाला झालेला आहे. मनी लॉन्ड्रींग झाली आहे. त्यामुळे त्याची चौकशी व्हायला हवी. नंदकिशोर चतुर्वेदी हा आहे कि त्याचा मनसुख हिरेन तर केला नाही ना? याची माहिती दिली पाहिजे”, असेही ते त्यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: