मी केलेले आंदोलन बाळासाहेबांना नक्कीच आवडले असते : नितेश राणे

टीम महाराष्ट्र देशा : मुंबई-गोवा महामार्गावरीत खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होते. या विरोधात नितेश राणे यांनी उप-अभियंत्याला गडनदी पुलावर बांधून त्यांच्या डोक्यावर चिखलाचे पाणी टाकत आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. आमदार नितेश राणे आणि त्यांच्या १८ समर्थकांना जामीन मंजूर करण्यात आला.

या दरम्यान, जामिनावर बाहेर आल्यानंतर नितेश राणे म्हणाले की, ‘चिखलफेक’ आंदोलन कुणाला आवडो न आवडो बाळासाहेब ठाकरे यांना नक्कीच आवडलं असतं, अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. ते म्हटले असते शाब्बास नितेश तू चांगलं काम केलंस, असे म्हणत नितेश राणेंनी पालकमंत्री दिपक केसरकर यांना अप्रत्यक्ष टोला मारला.

त्याचप्रमाणे दीपक केसरकर यांनी आम्हाला जेलमध्ये बसतानाचे फोटो पाहण्याचे स्वप्न पाहण्यापेक्षा जिल्ह्याच्या विकासासाठी स्वप्न पाहावं. महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी स्वप्न पाहा. त्यासाठी तुम्हाला जनतेने निवडून दिले आहे. ‘अपना भी टाईम आयेगा’ हे लक्षात ठेवा, असं म्हणत नितेश यांनी दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला आहे.