Share

Nitesh Rane | “…त्यापुर्वी आदित्य ठाकरेंनी पुरुषाच्या आवाजात बोलून दाखवाव”, नितेश राणेंची बोचरी टीका

Nitesh Rane | मुंबई : राणे आणि ठाकरे कुटंबामध्ये सध्या शाब्दिक वार चालू आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची खिल्ली उडवली होती. यालाच आता भाजप (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राणे साहेबांना त्यांच्या मंत्रालयाचा फुलफॉर्म येतो का हे विचारण्या अगोदर आदित्यने आपलं फुल नाव ‘पुरुषाच्या’ आवाजात बोलून दाखवाव, असा खोचक टीका नितेश राणेंनी लगावला आहे. याबाबत त्यांनी ट्विट देखील केलं आहे.

नितेश राणे यांचं ट्विट –

नारायण राणेंनी विविध पक्षात जाऊन विविध पदे भोगली, त्यातील एक चांगले काम त्यांनी सांगावे, किंवा त्यांच्या खात्याचा फुलफॅार्म सांगावा, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती. दोन दिवसापूर्वी एका कार्यक्रमात नारायण राणे यांच्यावर ठाकरेंनी टीका केली होती.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता संपली असून ठाकरेंचे राजकारण आता मातोश्रीपुरते शिल्लक राहिले आहे. ठाकरे यांच्याकडे असलेल्या आमदारांपैकी ४ जण माझ्या संपर्कात आहेत,” असा दावा नारायण राणे यांनी केला होता.

महत्वाच्या बातम्या :

Nitesh Rane | मुंबई : राणे आणि ठाकरे कुटंबामध्ये सध्या शाब्दिक वार चालू आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now