Share

Nitesh Rane | “उद्धव ठाकरे संपलेला माणूस आहे”; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

अमरावती : राज्यामध्ये निवडणूकांचं वारं घुमू लागलं आहे. सगळे पक्ष आगामी निवडणुकांच्या तयारीला लागले असल्याचं पाहायला मिळतं आहे. यामध्ये सत्ताधारी पक्षनेते आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची खेळी रंगल्याचं दिसून येतं आहे.तर दुसरीकडे भाजप पक्षाचे नेते नितेश राणे शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयत. अशातच नितेश राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले नितेश राणे ?

उद्धव ठाकरे संपलेला माणूस आहे, असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच वार केला आहे. अमरावतीमध्ये भाजप पक्षाचे खासदार अनिल बोंडे यांच्या मुलाच्या लग्नासाठी नितेश राणे उपस्थित राहिले होते. त्यावेळी राणे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

अंधेरी (पूर्व) निवडणूकीवरून सध्या खूपच राजकीय वातावरण तापलं आहे. त्याच ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महानगरपालिकेडून अद्याप स्वीकारला गेला नाहीय. याबद्दल नितेश राणेंना विचारण्यात आले. त्यावर उद्धव ठाकरे काय करतात, याची मला चिंता नाही. उद्धव ठाकरे संपलेला माणूस आहे. त्यावर जास्त कशाला बोलायचं?, असा खोचक सवाल राणे यांनी केला.

तसेच, नितेश राणे यांनी अमरावती आणि धुळ्यात झालेल्या नारेबाजीवरही भाष्य केलं आहे. अशा पद्धतीची घोषणा आणि अशी नाटकं आमच्या महाराष्ट्रात चालणार नाहीत. राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. तुम्हाला तुमचे सण साजरे करायचे असतील, तर शांततेत करा. हिंदुंना कोणतंही आव्हान द्यायचा प्रयत्न करायचा नाही. आता महाविकास आघाडीचं सरकार नाहीये. नवाब मलिक अल्पसंख्याक मंत्री नाहीयेत आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाहीयेत. ही सगळी नाटकं जे कुणी करत असतील, त्यांना पोलीस शोधून काढतील आणि पुन्हा अशा घोषणा होणार नाहीत याची काळजी आमचं सरकार घेईल, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

अमरावती : राज्यामध्ये निवडणूकांचं वारं घुमू लागलं आहे. सगळे पक्ष आगामी निवडणुकांच्या तयारीला लागले असल्याचं पाहायला मिळतं आहे. यामध्ये सत्ताधारी पक्षनेते …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics