Share

Nitesh Rane | “एक साधा फोटोग्राफर एवढी संपत्ती…”, नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Nitesh Rane | मुंबई : गौरी भिडे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) रश्मी ठाकरे(Rashmi Thackeray), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (High Court) जनहित याचिका दाखल आली आहे. या याचिकेत ठाकरेंकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप (BJP) पक्षाचे नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले नितेश राणे (Nitesh Rane) 

एक साधा फोटोग्राफर एवढी संपत्ती कशी जमवू शकतो?,असा खोचक सवाल करत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्याचबरोबर नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्विट करत गौरी भिडे (Gauri Bhide) यांच्या संरक्षणाची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट (Tweet) केलं आहे.

त्या ट्विटमध्ये नितेश राणे म्हणाले की, “गौरी भिंडेंनी ठाकरे कुटुंबियांच्या संपत्तींच्या चौकशीविषयी याचिका दाखल केली आहे. मात्र, मनसुख हिरेन, दिशा सालियान, सुशांत सिंह राजपूत यांची संशयास्पद हत्या किंवा मृत्यू झाले. त्यानंतर त्याचे सर्व पुरावे नष्ट करण्यात आले. तशा प्रकारचा धोका गौरी भिडे यांना भेडसावू शकतो, म्हणून राज्य सरकराने याची काळजी घ्यावी.”

दरम्यान, बेहिशोबी संपत्ती जमावल्याचा आरोप करत ठाकरे कुटुंबियांची चौकशी व्हावी, अशी मागणी दादरमधील रहिवासी गौरी भिडे आणि त्यांचे वडील अभय भिडे यांनी ही याचिका दाखल करत केली आहे. बुधवारी ( 19 ऑक्टोंबर ) न्यायमूर्ती एस. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. मात्र, गौरी भिडे यांची याचिका स्वीकारण्यास कोणीही वकील तयार नसल्याने, 16 नोव्हेंबरपर्यंत सुनावणी स्थगित करण्यात आली असल्याचं समजतं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Nitesh Rane | मुंबई : गौरी भिडे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) रश्मी ठाकरे(Rashmi …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now