मुंबई : मुंबई महपालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये अत्यंत लाजिवाणी अशी घटना घडली आहे. वरळीतील (worli) बीडीडी चाळ येथील घरातील सिलिंडर स्फोटात (Cylinder explosion) गंभीररित्या भाजलेल्या रुग्णांवर वेळेवर उपचार सुरू न केल्याची घटना (treatment not on time) नायर रुग्णालयात (nair hospital) घडली. या अपघातात चार जण गंभीर जखमी (four people injured) झाले. नायर रुग्णालयात मंगळवारी सकाळी गंभीररित्या भाजलेल्या पुरुष आणि वर्षभराचं बाळ तासभर उपचाराविना तडफडत होतं. या बाळाचा आता दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यावरुन आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
छोट्याश्या चिमकुल्या बाळाने वेदनेने विव्हळत आपले प्राण सोडले. हीअत्यंत वेदनादायी घटना आहे. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की, या कुटुंबाला दुखातून सावरण्याचं बळ मिळो. आदित्य ठाकरे माणुसकी जपा. कारण आपल्या’ कर्माचा’ हिशोब इथेच चुकवावा लागतो, असं नितेश राणे म्हणाले आहेत.
हीच का महापालिकेच्या दवाखान्यातील ‘तत्पर सेवा‘? नायर रुग्णालयातील असंवदेनशील व लाजिरवाणा प्रकार. ही दृश्य पेंग्वीन प्रेमी पर्यटनमंत्र्यांच्या मतदार संघातील दवाखान्यातील आहेत. हे दृश्य पाहून कुणाच्याही काळजाचं पाणी होईल पण डॉक्टर्स मात्र लक्ष द्यायला तयार नाहीत. लाज वाटली पाहिजे. आम्ही मुंबईकरांना मोफत उपचार देतो अशी शेखी मिरवणाऱ्या सत्ताधारी सेनेने रुग्णालयांकडे दुर्लक्ष केलं. कोणतीही वचक नाही. आदित्य ठाकरे पेंग्विनच्या जीवाच्या काळजीत एवढे मशगूल आहेत की त्यांना आपलेच मतदार उपचाराविना तडफडून मेले तरी चालतील, असंही नितेश राणे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- …मग 5 हजार कर्मचाऱ्यांचे निलंबन हा काय लोकशाहीचा विजय का?- सदाभाऊ खोत
- ‘महाविकास आघाडी सरकार पालथ्या पायाचं, त्यामुळे महाराष्ट्र अडचणीत’
- ममता बॅनर्जी यांच्या भेटीनंतर शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
- ‘महाविकास आघाडी सरकार पालथ्या पायाचं, त्यामुळे महाराष्ट्र अडचणीत’
- पुण्यात चिंतेचं वातावरण! नायजेरियातून आलेले 2 नागरिक करोना पॉझिटिव्ह
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<