रामदास कदम म्हणजे ठाकरेंचं कुत्रं – नितेश राणे

टीम महाराष्ट्र देशा: राज्याचे पर्यावरणमंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी खा नारायण राणे म्हणजे कोकणाला लागलेला डाग असल्याची टीका शुक्रवारी केली होती.कदम यांची टीका राणे कुटुंबियांना चांगलीच जिव्हारी लागल्याच दिसत आहे. आता आ नितेश राणे यांनी कदम यांच्यावर पलटवार करताना त्यांची तुलना थेट कुत्र्याशी केली आहे.

स्व.मान बाळासाहेब असतील, राजसाहेब असतील यांना कुत्रे आवडतात.. उद्धव ठाकरे नी पण तीच परंपरा चालु ठेवली आहे.. रामदास कदम च्या रुपत!! सतत भोकतअसतो..त्याला हे माहित नाही.. भूकणारे कुत्रे कधी चावत नाहीत. असे घणाघाती ट्विट आ राणे यांनी केले आहे.

राणेंनी आजवर किती पक्ष बदलेले आहेत, शिवसेनासोडून ते कॉंग्रेसमध्ये गेले, त्यानंतर भाजपमध्ये गेले आहेत. राणेंसाठी आता केवळ रामदास आठवले यांचा पक्ष राहिला आहे.  त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी शिवसेनेच्या जोरावर कोट्यावधींची संपत्ती कमावली आहे. त्यामुळे मातोश्रीवर टीका करण्याची त्यांची लायकी नसल्याची टीका रामदास कदम यांनी केली होती

You might also like
Comments
Loading...