राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धनंजय मुंडेंना मोठे करत असल्याने प्रचंड नाराजी – नितेश राणे

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धनंजय मुंडेंना मोठे करत असल्याने प्रचंड नाराजी आहे अस मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केल आहे. तर ‘राज्यातील काँग्रेस नांदेडपुरती मर्यादित आहे. उद्धव ठाकरे रंग मारलेला वाघ आहेत. अशा परिस्थितीत जनतेसमोर आम्ही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा पर्याय घेऊन जात आहोत. आमच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मराठवाड्यातून विविध पक्षांतील नाराज नेते, कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत. त्याची झलक रविवारी पाहायला मिळेल,’ अशी टोलेबाजी देखील आमदार नितेश राणे यांनी केली

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांची रविवारी (११ फेब्रुवारी) औरंगाबादेत सभा होणार आहे. पक्षस्थापनेनंतर राणे प्रथमच मराठवाड्यात येत असल्याने त्यांच्या सभेला राजकीयदृष्ट्या मोठे महत्व प्राप्त झाले आहे. सभेच्या पूर्वतयारीसाठी शहरात आलेल्या आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.त्यावेळेस ते बोलत होते.