Share

Nitesh Rane | “चुलीत जाऊ द्या आमदारकी, डब्यात जाऊ द्या ती खासदारकी, कोण मोजत नाही”

Nitesh Rane | कोल्हापूर :  राज्यातील राजकीय वातावरण सध्या खूपच गढूळ झालं आहे. अशातच आज कोल्हापुरमध्ये (Kolhapur) लव्ह जिहादविरोधात हिंदू जनआक्रोश मोर्चा (Hindu Janakrosh Morcha) काढण्यात आला आहे. यावेळी भाजप पक्षाचे नेते नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याचं पाहायला मिळतं आहे. चुलीत जाऊ द्या आमदारकी, डब्यात जाऊ द्या ती खासदारकी, कोण मोजत नाही, असं विधान नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलं आहे.

काय म्हणाले नितेश राणे (Nitesh Rane)

आम्ही भाषणं देण्यासाठी इथं जमलेलो नाही. चुलीत जाऊ द्या आमदारकी, डब्यात जाऊ द्या ती खासदारकी, कोण मोजत नाही. मी मरताना ते आमदार पद लागणार नाहीये. मी मरताना एक हिंदू मेला असं ते लोक सांगणार आहेत. म्हणून हिंदू म्हणून तुम्ही कसे जगणार आहात, हिंदू म्हणून आपल्या धर्माचं कसं रक्षण करणार आहात हे आज ठरवण्याची गरज असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की, मुस्लिमांना आंदोलन करण्याची वेळ आली अशी एक घटना दाखवा. त्यांच्या कोणत्याही व्यक्तिकडे किंवा धर्माकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर ते त्याला जीवंत ठेवत नाही. अशी असंख्या उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो. मात्र, आपल्याला टोप्या घालाव्या लागतात, गमछे घालावे लागतात, घोषणा द्याव्या लागतात. आपल्याला किरण पावसकर, नितेश राणे लागतात, मगच आपण काहीतरी करतो आणि मगच आपण काहीतरी करतो. हीच आपली शोकांतिका आहे.

तसेच, नगरमध्ये एका हिंदू मुलाने एका मुस्लीम तरुणीशी लग्न केलं. त्यानंतर तिकडच्या सर्व मुस्लिमांनी एकत्र येऊन त्या मुलाला ठेचून काढलं. कारण तो मुलगा हिंदू होता. ते लोक धोरणं देत बसली नाही, टोप्या घालत घोषणा देत बसली नाही. घरात माता-भगिणी सुरक्षित नसतील तर तुम्हाला जय श्रीराम म्हणण्याचा आणि भगव गमछा घालण्याचा काय अधिकार आहे?, असा सवालही नितेश राणेंनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Nitesh Rane | कोल्हापूर :  राज्यातील राजकीय वातावरण सध्या खूपच गढूळ झालं आहे. अशातच आज कोल्हापुरमध्ये (Kolhapur) लव्ह जिहादविरोधात हिंदू …

पुढे वाचा

Kolhapur Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now