उद्धव ठाकरे म्हणजे केवळ रंग मारलेला वाघ – नितेश राणे

नितेश राणे

टीम महाराष्ट्र देशा : ‘उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय क्षमता आहे, हे सर्वांना माहित आहे. बाळासाहेबांसारखी त्यांच्यात हिंमत नाही. ते केवळ रंग मारलेला वाघ आहेत. अशी घणाघाती टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे. शिवसेना ‘एनडीए’तून बाहेर पडल्याचे सांगते आणि दुसरीकडे बैठकांना उपस्थित राहते. उद्धव ठाकरे ठोस भूमिका घेत नसल्याने पक्षातील अनेकजण अस्वस्थ आहेत़ असही ते म्हणाले.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांची रविवारी (११ फेब्रुवारी) औरंगाबादेत सभा होणार आहे. पक्षस्थापनेनंतर राणे प्रथमच मराठवाड्यात येत असल्याने त्यांच्या सभेला राजकीयदृष्ट्या मोठे महत्व प्राप्त झाले आहे. सभेच्या पूर्वतयारीसाठी शहरात आलेल्या आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.त्यावेळेस ते बोलत होते.Loading…
Loading...