नितेश राणे ठोकणार मुंबई महापालिकेला ‘टाळे’

नितेश राणे

टीम महाराष्ट्र देशा: कमला मिल कम्पाऊंडमध्ये लागलेल्या आगीमुळे आता राजकीय वातावरण पेटलं आहे. या आगीच्या कारणावरून शिवसेना आणि मुंबई महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. मुंबईमध्ये वारंवार घडत असलेल्या दुर्घटनांमुळे सामान्य नागरिकांचा जीव जात आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. पावसाळ्यात मुंबई तुंबते त्यावेळी मुंबईकरांचे बेहाल होता. तसेच शहरातील इमारती कोसळण्याच्या दुर्घटनाही काही कमी नाही. मुंबई प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणी इमारतीला आग लागण्याच्याही घटना घडतात.

आता हे सगळे मुद्दे घेऊन कॉंग्रसचे आमदार नितेश राणे चांगलेच आक्रमक झाले आहेत. ते आता रस्त्यावर उतरून मुंबई महापालिकेला ‘टाळे ठोक’ मोर्चा काढणार आहेत. या संबंधी ट्विट करून त्यांनी हि घोषणा केली आहे.