निशिगंधा वाड लवकरच दिसणार ‘जिजामाता’ यांच्या भूमिकेत

निशिगंधा वाड

मुंबई : स्टार प्रवाह लवकरच प्रेक्षकांनासाठी एक नवी ऐतिहासिक मालिका घेऊन येणार आहेत. २६ जुलैपासून रात्री १० वाजता ‘जय भवानी जय शिवाजी’ ही मालिका सुरू होणार असून, स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांची शौर्यगाथा या मालिकेच्या रुपात उलगडणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेत लोकप्रिय अभिनेते अजिंक्य देव बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारणार आहेत. तर राजमाता जिजाऊ ही व्यक्तिरेखा अभिनेत्री निशिगंधा वाड साकारणार आहेत.

निशिगंधा या स्वत: इतिहासाच्या अभ्यासक आहेत. त्यामुळे जिजाऊ साकारणं हा अत्यंत सुखद अनुभव असल्याची भावना त्यांनी व्यक्त केलीय. ‘पालनकृत, ताठ कण्याच्या, कर्तबगार, कर्तृत्ववान जिजाऊ साकारणं हे भाग्याचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. हे पात्र साकारताना आणि जिजाऊंच्या रुपात उभं करण्यामागे बऱ्याच जणांचे कष्ट आहेत. इतकी कणखर भूमिका साकारायला मिळणं हा खूप चांगला योग आहे’, असं त्या म्हणाल्या आहेत.

‘जय भवानी जय शिवाजी’ ही मालिकेत अभिनेता भुषण प्रधान छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार असून सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव बाजीप्रभू देशपांडेंच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर अभिनेता कश्यप परुळेकर नेतोजी पालकरांची भूमिका साकारणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP