अयोध्येतील वादग्रस्त जमीन आमचीच, निर्मोही आखाड्याचा दावा 

blank

टीम महाराष्ट्र देशा: अयोध्येतल्या वादग्रस्त जागेवर निर्मोही आखाड्यानं दावा केला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दररोज सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या नुसार आज झालेल्या सुनावणीत निर्मोही आखाड्यानं, या संपूर्ण जागेवर दावा सांगत, सुमारे पावणे तीन एकरांचा हा परिसर गेल्या शेकडो वर्षांपासून आपल्या ताब्यात असल्याचं सांगितलं.

रामजन्मभूमी परिसराच्या आतलं अंगण, अंगणातली सीता रसोई, चौथरा, तसंच भंडारगृह याचा ताबा कायम निर्मोही आखाड्याकडे होता, आणि त्याबाबत कधीही कोणताही वाद नव्हता, असं आखाड्याकडून सांगण्यात आलं. या सर्व जागेचा ताबा आणि व्यवस्थापन निर्मोही आखाड्याकडे सोपवावं, अशी मागणी आखाड्यानं सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. या प्रकरणातल्या कोणत्याही पक्षाचा युक्तिवाद थांबवण्याचा न्यायालयाचा विचार नाही, सर्व पक्षांनी युक्तिवाद करताना, न्यायालयाची प्रतिष्ठा राखावी, असं सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालय आजपासून अयोध्येतल्या रामजन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणी नियमित सुनावणीला सुरुवात झाली आहे. या संदर्भात नेमलेल्या मध्यस्थी  समितीकडून निर्धारित मुदतीत कोणताही समाधानकारक तोडगा न निघाल्यामुळे आता या प्रकरणी दररोज सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होणार आहे.

जम्मू काश्मीर झालं… आता बेळगाव प्रश्नही मार्गी लावा’ 

जाणून घ्या कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला कुणी दिला पाठींबा कुणी केला विरोध

पाच वर्षात फडणवीस सरकारने अधोगतीचा इतिहास रचला – जयंत पाटील