Budget 2019 : ‘जे ५५ वर्षात झालं नाही ते आम्ही पाच वर्षात करुन दाखवलं’

टीम महाराष्ट्र देशा- नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प 2019 आज सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी बोलताना जे ५५ वर्षात झालं नाही ते आम्ही पाच वर्षात करुन दाखवलं असा दावा सीतारामन यांनी केला आहे.

अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सरकारच्या मजबूत धोरणांविषयी सांगताना सुरूवातीलाच, ‘यकीन हो तो कोई रास्ता निकलता है, हवा की ओट भी लेकर चिराग जलता है।’ अशी शायरी सादर करत देशवासीयांची मने जिंकून घेतली. निर्मला सीतारामन देशाच्या पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री आहेत . याआधी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अर्थ मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला होता. तेव्हा पूर्णवेळ महिला अर्थमंत्र्याने अर्थसंकल्प सादर करायची ही पहिलीच वेळ आहे.

दरम्यान,या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी निर्मला सीतारामन यांचे आई-वडिल सावित्री आणि नारायण सीतारामनही संसदेत उपस्थित आहे