इंदिरा गांधी नंतर भारताला प्रथमच महिला संरक्षण मंत्री

नवी दिल्ली : खातेवाटपात सर्वात महत्वाचं असं संरक्षण मंत्रिपद निर्मला सीतारमन यांना देण्यात आले आहे. इंदिरा गांधींनंतर संरक्षण खातं सांभाळणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपेक्षेप्रमाणे धक्कादायक रित्या मंत्रिपदाचे खांदेपालट केले आहे. यापूर्वी वाणिज्य मंत्री असणाऱ्या निर्मला सीतारमन यांनी स्टार्ट अप इंडिया या मोदी सरकारच्या महत्वपूर्ण योजनेला यशस्वी करण्यात महत्वाची भूमिका पार पाडली होती. निर्मला सीतारमन यांच्यानंतर आता वाणिज्य खात्याची जबाबदारी माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

कॅबिनेट मंत्री

सुरेश प्रभू – वाणिज्य
पियुष गोयल – रेल्वे
उमा भारती – पेयजल आणि स्वच्छता
धर्मेंद्र प्रधान – पेट्रोलियम आणि कौशल्यविकास
नितीन गडकरी – रस्ते वाहतूकसह गंगा स्वच्छता अभियानचा अतिरिक्त भार
स्मृती इराणी – माहिती प्रसारण आणि वस्त्रोद्योग
राज्यवर्धन राठोड – क्रीडामंत्री
आर. के. सिंग – ऊर्जा (स्वतंत्र कारभार)

राज्यमंत्री

सत्यपाल सिंग – शिक्षण राज्यमंत्री
गजेंद्र शेखावत – कृषी राज्यमंत्री
हरदीप पुरी – नगरविकास राज्यमंत्री
नरेंद्र तोमर – ग्रामविकास राज्यमंत्री
अल्फोन्स कन्ननाथनम् – पर्यटन राज्यमंत्री
महेश शर्मा – संस्कृती आणि पर्यावरण राज्यमंत्री
शिवप्रताप शुक्ल – अर्थ राज्यमंत्री