निर्भयाच्या आई-वडिलांनी मुलीच्या न्यायासाठी मतदानावर टाकला बहिष्कार

टीम महाराष्ट्र देशा : दिल्लीतील निर्भया हत्याकांडाला जवळपास 7 वर्षे उलटून गेली. मात्र अजूनही आरोपींना शिक्षा झालेली नाही. त्यामुळे आम्ही यंदा निवडणुकीत मतदान करणार नसल्याचा निर्णय निर्भयाच्या माता पितांनी घेतला आहे. प्रत्येक पक्ष आम्हाला न्याय मिळवून देण्याचे वचन देतो. आमच्या मुलीला न्याय मिळेल, असे सांगतात. पण, त्यांची सहानुभूती, त्यांची वचने आणि त्यांची आश्वसने सर्वच खोटं असल्याचे म्हणत आशा देवी आणि बद्रिनाथसिंह यांनी आरोपींना कधी शिक्षा होणार ? असा सवाल उपस्थित केला आहे.

राजधानी दिल्लीत  डिसेंबर 2012 मध्ये चालू बसमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर सर्वत्र देशभर निदर्शने करण्यात आली असून आरोपींना लवकरात लवकर शिक्षा करण्याची मागणी जनतेकडून करण्यात आली. मात्र अद्याप अजूनही त्या आरोपींना शिक्षा झालेली नाही. त्यामुळे येणारे प्रत्येक सरकार हे आमची फसवणूक करत आहे. आम्हाला अजून न्याय मिळाला नाही. असे म्हणत निर्भयाच्या आई-वडिलांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

यावेळी निर्भयाच्या आई म्हणाल्या की, देशातील रस्त्यावर आजही एखादी मुलगी किंवा स्त्री बिनधास्तपणे चालू-फिरू शकत नाही. स्त्रिया आणि लहान मुले आजही राक्षसी वृत्तीचे शिकार होत आहेत. प्रत्येक पक्ष आम्हाला न्याय मिळवून देण्याचे वचन देतो. आमच्या मुलीला न्याय मिळेल, असे सांगतात. पण, त्यांची सहानुभूती, त्यांची वचने आणि त्यांची आश्वसने सर्वच खोटं आहे. तसेच सर्वच पक्ष महिला सक्षमीकरण आणि सुरक्षेविषयी बोलतात. मात्र, कुठल्याही पक्षाकडे यासाठी कोणतीही योजना नाही. आपल्या स्वार्थासाठी लोकांन वेड्यात काढण्याचे काम या राजकीय पक्षांकडून केले जात आहे असे निर्भयाचे वडील म्हणाले.Loading…
Loading...