fbpx

नीरव मोदीला झटका,कोर्टाने चौथ्यांदा जामीन अर्ज फेटाळला

nirav modi and punjab national bank fraud

टीम महाराष्ट्र देशा :पंजाब नॅशनल बँकेसह भारतातल्या सरकारी बँकांची करोडो रुपयांची फसवणूक करून लंडनला पळून गेलेल्या नीरव मोदीचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. हिरे व्यापारी असलेल्या नीरव मोदीचा जामीन अर्ज चौथ्यांदा फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे तो आता लंडनच्या तुरुंगातच राहणार आहे.

नीरव मोदीनं २ अब्ज डॉलर पंजाब नॅशनल बँकेतून कर्ज म्हणून घेतले होते आणि ते न फेडताच त्यानं देशातून पळ काढला. फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नीरव मोदीला भारताकडे सोपवण्यात येईल. नीरव मोदीला स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी लंडनमध्ये १९ मार्च ला अटक केली होती. त्यानंतर भारताकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. नुकताच युकेच्या वेस्टमिनस्टर कोर्टाने गेल्या महिन्यात त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.