निरंजनसोबत २ तास चर्चा केली; पण त्याची पक्ष सोडण्याची मानसिकता झाली होती- अजित पवार

ajit pawar pc

पुणे: “वसंत डावखरे हे पडलो तरी चालेल पण पवार साहेबांना सोडणार नाही म्हणायचे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वसंत डावखरेंना अनेक पदं दिली. आणि आता त्यांचा मुलगा निरंजन डावखरेला २ तास घेऊन बसलो पण त्याची मानसिकता राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडण्याची झाली होती.” असे अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांसोबत बोलतांना स्पष्ट केले.

स्थानिक गोष्टी मला निरंजन डावखरे यांनी सांगितल्या होत्या. मी म्हटले स्थानिक राजकारणात अस भांड्याला भांड लागतच. तसेच त्यांनी मला वडील नाहीत, आता माझं कस होणार हे विचारले. तेव्हा मी त्याला जेष्ठांच्या सभागृहात सदस्य केलं. एखाद्याला जायचंच म्हटल तर वेळ लावण्यात काय अर्थ. असेही पवार म्हणाले.

निवडणूक आली की दुसऱ्यांकडे चांगला उमेदवार असला की त्याला पक्षात घेतलं जातं मोदींचा मतदार संघचं घाण आहे, मग कसली स्वच्छता करताय. कोणतीही गोष्ट भाजप पूर्णत्वास घेऊन जाऊ शकेलेलं नाही. अशी टीका अजित पवार यांनी केली.

राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या त्रासाला व स्थानिक राजकारणाला कंटाळून आपण राष्ट्रवादी पक्ष सोडत आहे. पक्षाने आपल्याला खूप प्रेम दिले असून आपल्याला पक्ष हा कुटुंबासारखा होता, परंतु स्थानिक नेत्यांनी कायमच अनेक अडचणी निर्माण केल्याने व त्याची तक्रार करूनही आपली दखल न घेतल्याने हा आपल्यावर होणार अन्याय आहे, अनेक वर्षे पक्षाचे काम करताना आपण व आपल्या वडिलांनी पक्षासाठी अनेक खस्ता खाल्या आहेत व पक्षवाढीसाठी अनेक प्रयत्न केले आहेत, परंतु स्थानिक नेत्यांना त्याच्याशी काही देणे घेणे नाही व ते आता आपल्याला डावलण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेत असल्याचे निरंजन डावखरे यांनी सांगितले होते.