राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला ‘हा’ युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष

ठाणे : ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्षपदी कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीद्वारे भाजपने तरुण व स्वच्छ प्रतिमेच्या चेहऱ्याला पसंती दिली असल्याचे मानले जात आहे.

डावखरे यांना तीन वर्षाचा कालावधी मिळणार आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली २०२२ची महापालिका निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. भाजपच्या शहराध्यक्षपदासाठी आमदार निरंजन डावखरे यांच्याविरोधात कोणत्याही कार्यकर्त्याने अर्ज दाखल न केल्यामुळे त्यांची निवड झाली.

Loading...

भाजपचे कोकण प्रभारी व निवडणूक अधिकारी रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते निरंजन डावखरे यांना अध्यक्षपदाचे पत्र देण्यात आले. यावेळी आमदार संजय केळकर, मावळते शहराध्यक्ष संदीप लेले यांच्यासह भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार डावखरे यांच्याकडून कोकण पदवीधर मतदारसंघाचे २०१२ पासून प्रतिनिधित्व केले जात आहे. आगामी काळात ठाणे शहरातील संघटनात्मक बांधणीवर भर दिला जाईल. त्याचबरोबर २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवू, अशी घोषणा अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आमदार डावखरे यांनी केली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण