हा भारतीय तरुण होणार व्हॉट्सअॅपचा सीईओ

व्हॉट्स अॅप, नीरज अरोरा

वेब टीम- व्हॉट्सअॅप या मेसेजिंग अॅपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदासाठी भारतीय नीरज अरोराचे नाव आघाडीवर आहे. नीरज गेल्या सात वर्षांपासून व्हॉट्स अॅपमध्ये बिझनेस एक्झिक्युटिव्ह पदावर कार्यरत आहेत.

नीरज अरोरा हे दिल्ली आयआयटीचे माजी विद्यार्थी आहेत. पदवी घेतल्यानंतर 2006 साली त्यांनी इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए इन फायनान्स अँड स्ट्रॅटेजी केले. दिल्ली आयआयटीमधून पदवी घेतल्यानंतर ते 2000 साली अॅसिलिओन या कंपनीत नोकरीला लागले. यानंतर त्यांनी टाइम्स इंटरनेट, पेटीएम आणि गुगलनंतर ते व्हॉट्स अॅपमध्ये रूजू झाले.