नगरमध्ये सोमवार पासून नववी ते बारावी शाळा सुरु होणार; जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिसूचना जारी!

nagar

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राज्यात सध्या जरी कोरोना नियंत्रणात असला तरी दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असे बोलले जात आहे. राज्यात कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा येत्या सोमवारपासून सुरू होत आहेत. नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

त्यानुसार अहमदमनगरध्ये सोमवारपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु होणार आहेत. अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी याबाबत अधिसूचना जारी करत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागदर्शक सूचनादेखील जारी केल्या आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातील शाळा सुरु करत असताना स्थानिक जिल्हा अधिकारी, गट विकास अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करावा. शाळा सुरु करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरु कराव्यात. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत.

दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. येत्या २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

पण आता दिल्लीतील परिस्थिती पाहता ३१ डिसेंबरपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. कोरोनाची स्थिती जर वाढली तर विद्यार्थ्यांना त्याचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे खबरदारी म्हणून पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या