ठरलं ! नववी, अकरावीचे विद्यार्थी परीक्षांविनाच पास, तर दहावी-बारावीच्या परीक्षा…

exam

मुंबई : कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. सोमवार ५ एप्रिल पासून ते ३० एप्रिल पर्यंत हे नियम लागू राहणार आहेत. राज्यात रात्री आठ ते सकाळी ७ दरम्यान संचारबंदी तर दिवसभर जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने मोठ्या संख्येने वाढ होत असल्यामुळे राज्याची स्थिती चिंताजनक होत असतानाच आता काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांचे काय होणार ? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात काल शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये महत्वपूर्ण बैठक पार पडली. मात्र, यामध्ये कोणताच निर्णय झाला नसल्याचे समोर आले होते.

या बैठकीत नववी आणि अकरावीच्या परीक्षा घेऊ नये अशी चर्चा झाली होती. आता पहिली ते आठवी प्रमाणेच नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना देखील प्रमोट केलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर, दहावी-बारावीच्या परीक्षा या महत्वाच्या व बोर्डाच्या परीक्षा असल्याने त्या ऑफलाईन पद्धतीनेच घेतल्या जाणार असल्याचं देखील समजत आहे. दरम्यान, दहावी-बारावीच्या परीक्षांच्या सुधारित तारखांबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नसून काही दिवसात याचा निर्णय येण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या