कल्याणमध्ये बँकेबाहेर नऊ लाख रुपयांची लूट

cash robbery pune

कल्याण : कोनगावमध्ये बँकेत पैसे घेऊन निघालेल्या तरुणाचे ९ लाख रुपये लुटल्याची घटना घडली आहे. अर्षद अन्सारी ऑफिसचे १० लाख रुपये घेऊन खडकपाडा भागातील अॅक्सिस बँकेत आला होता. यावेळी दोन अज्ञातांनी त्याच्या हातातील पैशांची पिशवी घेऊन पळ काढला. बँकेत १ लाख रुपये जमा करुन उर्वरित ९ लाख रुपये घेऊन अर्षद पुन्हा ऑफिसकडे निघाला होता. मात्र, त्यांची गाडी पंक्चर असल्याचे एका व्यक्तीने सांगितले. यावेळी गाडी पाहण्यासाठी अर्षद खाली वाकताच दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्या हातातली ९ लाख रुपयांची पिशवी खेचून नेली.Loading…


Loading…

Loading...