देगलूर पोटनिवडणुकीतून नऊ जणांची माघार, १२ उमेदवार निवडणूक रिंगणात

Deglur byelection,

नांदेड :  देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी परत घेण्यासाठी शेवटच्या दिवशी बुधवारी (ता. १३) ९ जणांनी माघार घेतली आहे. यामुळे निवडणूक रिंगणात आता १२ उमेदवार लढत देणार आहेत. देगलूर-बिलोली विधानसभेसाठी पोटनिवडणुक होत आहे. यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होण्याची शक्यता आहे.

या निवडणुकीसाठी २३ उमेदवारांनी ३४ अर्ज दाखल केले होते. ११ ऑक्टोंबर रोजी दाखल अर्जांची छाननी झाली. छाननी अंती २१ उमेदवारांचे अर्ज वैध तर विक्रम सुभाषराव साबणे व शितल रावसाहेब अंतापुरकर यांचा अर्ज अवैध ठरला होता. यानंतर १३ ऑक्टोंबर रोजी उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी २१ पैकी ९ उमेदवारांनी निवडणूकीतून माघार घेतली आहे. यामुळे आता १२ उमेदवार निवडणूक रिंगणात व लढत देत आहेत.

अर्ज परत घेणाऱ्यात धोंडीबा कांबळे, मरीबा रुमाले, विठ्ठलराव शाबकसार, विश्वंभर वरवंटकर व सिद्धार्थ प्रल्हाद हाटकर या पाच अपक्षांसह आंबेडकर नॅशनल काँग्रेस पार्टीचे प्रल्हाद हटकर यासह रामचंद्र भराडे, सूर्यकांत भोरगे व ॲड. लक्ष्मण देवकरे या ९ जणांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या