‘सच कहूं..’पुस्तकातून नीना गुप्तांनी टाकला जीवनावर प्रकाश

neena

मुंबई : अभिनयानाने आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नीना गुप्ता. त्यांनी अभिनयासह अनेक गोष्टींसाठी चर्चेत असतात. त्यांनी नुकतच एक पुस्तक लिहलं असून याबद्दल त्यांच्या जीवनातील काही सत्य गोष्टींवर प्रकाश टाकला आहे.

गेल्या काही दिवसांपासून चित्रपटापेक्षा नीना यांच्या जीवनावर आधारित पुस्तक ‘सच कहूं तो’मुळे चर्चेत आहेत. या पुस्तकात त्यांनी बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. या पुस्तकात त्यांनी त्यांचे खासगी आयुष्य, कुटुंब, अफेअर, ब्रेकअप अशा अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. नीना यांनी पुस्तकात कुटुंबातील काही समस्यांचा देखील उल्लेख केला आहे. त्यांनी हे पुस्तक वडील, आई, भाऊ आणि वहिनी यांच्या निधनानंतर लिहिले असून ‘ते जीवंत असताना मी हे पुस्तक लिहू शकले नसते’ असे नीना म्हणाल्या. या पुस्तकात कास्टिंग काउचचा देखील अनुभव सांगितला आहे. एका निर्मात्याने त्यांना हॉटेल रूममध्ये बोलावले होते आणि एक रात्र त्याच्यासोबत घालवण्यास सांगितली होती असा खुलासा त्यांनी केला होता. हा निर्माता बॉलिवूडमधील नसून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील होता.

नीना गुप्ता यांचा’सरदार का ग्रँडसन’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात नीना गुप्ता यांच्यासोबत अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंग मुख्य भूमिकेत दिसले. आगामी काळात नीना ‘गूडबाय’या चित्रपटात दिसणार असून अमिताभ बच्चन, रश्मिका मंदाना आणि पावेल गुलाटी हे कलाकार देखील असणार आहेत.

महत्वाच्या बातम्या