ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी निमित गोयल यांची बदली तर मोक्षदा पाटील औरंगाबादेत लोहमार्ग पोलीस अधीक्षक

औरंगाबाद : राज्यात विविध संवर्गातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहिर करण्यात आलेल्या आहेत. यात औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी निमित गोयल यांची बदली तर मोक्षदा पाटील औरंगाबादेत लोहमार्ग पोलीस अधीक्षक बदली करण्यात आली आहे. शिवाय राज्यातील पोलिस अधिक्षक तसेच पोलिस उपायुक्त पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेशांमध्ये औरंगाबाद शहर पोलिस आयुक्तालयातील मिना मकवाना आणि निकेश खाटमोटे पाटील यांचीही बदली करण्यात आली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या जागी उज्वला वनकर आणि अपर्णा सुधाकर गिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील एकुण ५४ पोलिस अधिक्षक आणि पोलिस उपायुक्त यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाकडून काढण्यात आलेल्या आहेत. यात शहर पोलिस उपायुक्त मिना मकवाना यांची बदली उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभागात करण्यात आली, तर निकेश खाटमोडे पाटील यांची बदली पोलिस अधिक्षक, फोर्स वन, युसीटीसी मुंबई येथे करण्यात आली आहे. यांच्या जागी औरंगाबाद गुप्तवार्ता विभागाच्या उपायुक्त उज्ज्वला वनकर यांची बदली औरंगाबाद पोलिस उपायुक्त पदी करण्यात आली आहे, तर नांदेड येथील नागरी हक्क संरक्षक पोलिस अधिक्षक अपर्णा सुधाकर गिते यांची शहर पोलिस उपायुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच, औरंगाबाद शहर पोलिस आयुक्तालयात गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर कार्यरत असलेले रविंद्र साळोखे यांचीही बदली पोलिस उप विभागीय पोलिस अधिकारी, शाहुवाडी, कोल्हापूर येथे करण्यात आली आहे. तर उपविभागीय अधिकारी विशाल ढुमे यांची बदली औरंगाबाद शहर पोलिस आयुक्तालय सहाय्यक पोलिस आयुक्त पदी करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या