महास्वामींच्या दाखल्याची जातवैधता पडताळणी सोलापुरातचं – नीलकंठ शिवाचार्य महास्वामी

सोलापूर :   संन्यासी असल्याने बोगसगिरीला आमच्याकडे थारा नाही. शिवाचार्यरत्न डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींच्या दाखल्याची जातवैधता पडताळणी सोलापुरातचं  झाल्याचे मैंदर्गी संस्थान हिरेमठाचे मठाधिपती श्री. ष. ब्र. नीलकंठ शिवाचार्य महास्वामी यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणाचे खासदार शरद बनसोडे यांनी ‘खासदार अमर साबळे हे सोलापूरसाठी उपरे, तर महास्वामींचा दाखला बोगस’ असल्याचा आक्षेप घेतला होता, याला त्यांनी प्रत्युत्तर दिले. नीलकंठ शिवाचार्य म्हणाले की, संन्याशांवर आक्षेप घेताना व आरोप करताना या मागची सत्यता पडताळून पाहिली पाहिजे. जगातील बोगसगिरी व अमानवियता नष्ट करण्यासाठी आम्हीच प्रयत्न करतो. कोणतीही बोगसगिरी करून आम्हाला काही मिळवायचे नाही. संन्यासी हे एक व्रत आहे.

अडथळे आणण्याचा प्रयत्न

उत्तर प्रदेशामध्ये आज योगी आदित्यनाथ यांच्या हातामध्ये धर्मदंड नव्हे तर राजदंडच आहे. मुख्यमंत्री म्हणून ते नेटाने काम करीत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील महास्वामींच्या आग्रहामुळे जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे आज राजकारणाच्या मार्गावर आहेत. त्यांच्या मार्गावर अडथळे आणण्याचा हा प्रयत्न असून, त्यांच्या दाखल्याची जातवैधता पडताळणी सोलापुरातचं  झाली आहे, असेही निलकंठेश्वर शिवाचार्य महास्वामी म्हणाले.