अग्रलेखांचे बादशहा म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ पत्रकार नीलकंठ खाडिलकर याचं निधन

blank

टीम महाराष्ट्र देशा : अग्रलेखांचे बादशहा म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक नवाकाळचे संपादक नीलकंठ खाडिलकर याचं आज सकाळी मुंबईत निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. आज दुपारी तीन वाजता चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दुपारी 12 ते 2 नवाकाळ कार्यालयात त्याचा पार्थिव देग अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.

ज्येष्ठ नाटककार आणि ‘केसरी’ चे भूतपूर्व संपादक कृ. प्र. खाडिलकर यांचे नातू असलेल्या निळुभाऊंनी जवळपास 27 वर्षे नवाकाळचे संपादक म्हणून काम पाहिले. खाडिलकर हे एक उत्तम मुलाखतकार होते. त्यांनी घेतलेल्या गोळवलकर गुरुजी आणि सत्य साईबाबा यांच्या मुलाखती अतिशय गाजल्या. त्यांच्या झंझावाती, मार्मिक आणि सामान्य वाचकालाही कळेल अशा सोप्या भाषेतील अग्रलेखांनी मराठी वृत्तपत्रसृष्टी समृद्ध केली.खाडिलकरांच्या अग्रलेखांचे पानहून अधिक संग्रह प्रकाशित झाले आहेत.

नीलकंठ खाडिलकर यांनी आपल्या तर्कशुद्ध आणि संदर्भासहित लेखनातून इतिहासाची मांडणी करत वाचकांचे प्रबोधन केले आणि त्याचवेळी वर्तमान सामाजिक-राजकीय परिस्थितीचे अभ्यासू व विवेकी विवेचनही वाचकांपर्यंत पोहचविले.

महत्वाच्या बातम्या