…म्हणून निलेश साबळेंनी मागितली नारायण राणेंची माफी

…म्हणून निलेश साबळेंनी मागितली नारायण राणेंची माफी

नारायण राणे

मुंबई : झी मराठीवरील प्रसिद्ध विनोदी मालिका ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) ने अनेकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. या मालिका लोकांना खळखळून हसण्यास भाग पाडले. यातील सर्वच कलाकरांनी आपल्या अंदाजात एक वेगळा ठसा उमटवला आहे. अनेक दिग्गज कलाकर या शोमध्ये हजेरी लावतात.

मात्र सध्या ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रमावर टीका करण्यात येत आहे. यामुळे आता या कार्यक्रमाच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याच झालं असं की, या शोमध्ये ‘दिवाळी अधिवेशन’ या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे पात्र दाखविण्यात आले होते. या पात्रावर राणे समर्थकांनी आक्षेप नोंदविला होता. अनेक कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या होत्या. तसेच राज्यभरात संताप व्यक्त केला गेला. याबाबत राणे समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

त्यानंतर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक निलेश साबळे (Nilesh Sable) व त्यांच्या टीमने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत दिलगिरी व्यक्त केली. तसेच एखादी व्यक्तिरेखा साकारताना कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. पुन्हा अशी चूक होणार नसल्याचे देखील निलेश साबळे यांनी सांगितले. यावेळी आमदार नितेश राणे (Nitesh Rane) देखील उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या