राज्यपालांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन निलेश राणेंची राऊतांवर बोचरी टीका

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सामनामधून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहेत. राज्यपाल हे फक्त सरकारी पैशावर पोसले जाणारे पांढरे हत्ती असल्याची टीका राऊतांनी केली. त्यांच्या या टीकेवरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलाच कलगितुरा रंगला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते निलेश राणे यांनी संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत राऊतांवर बोचरी टीका टीका केली आहे.

संज्या राज्यपाल समोर आल्यावर अशी शेपटी घालतो, असा संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत निलेश राणेंनी राऊत आणि राज्यपालांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

राज्यपाल हे फक्त सरकारी पैशावर पोसले जाणारे पांढरे हत्ती नाहीत. दिल्लीत सत्ता असलेल्या पक्षांची सरकारे ज्या राज्यांमध्ये नाहीत त्या राज्यांत ते मदमस्त उधळलेल्या हत्तीचाच ‘रोल’ अदा करतात व अशा हत्तींचे माहुत दिल्लीत बसून नियंत्रण करीत असतात. त्याच हत्तीच्या पायाखाली लोकशाही घटना, कायदा, राजकीय संस्कृती तुडवत वेगळे पायंडे पाडले जात असतात, असे राऊत सामनामध्ये म्हणाले आहेत.

केंद्राचे सरकार, पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे नेते असतात. मग राज्यांतील सरकारे भले त्यांना मानणाऱ्या राजकीय पक्षाची नसोत. त्या राज्यांना अस्थिर करणे म्हणजे राष्ट्रीय एकतेस चूड लावण्यासारखे आहे. महाराष्ट्रातील घडामोडी हा चूड लावण्याचाच प्रकार आहे. अर्थात, महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या