उद्धव ठाकरे शिंकले तरी रुमाल अनिल परब द्यायचा; निलेश राणेंचा प्रहार

nilesh rane anil parab

सिंधुदुर्ग : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी वाझेला १०० कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने देखील लेटरबॉम्ब टाकत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी खळबळ उडवून दिली आहे.

एनआयए कोर्टासमोर वाझेचे हस्तलिखित पत्र सादर केलं आहे. या पत्रात सचिन वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील खंडणी मागण्यासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप केला आहे. SBUT वरील चौकशी थांबवण्यासाठी व बृहन्मुंबई महापालिकेच्या काही ठेकेदारांकडून पैसे वसूल करण्यास सांगितल्याचे सचिन वाझे याने आपल्या पत्रात नमूद केलं आहे.

अनिल परब यांच्यावर आरोप झाल्यानंतर आता भाजप नेत्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी अत्यंत विखारी टीका केली आहे. ‘सचिन वाझेने सांगीतलं अनिल परब पण त्याच्यावर वसुलीसाठी दबाव टाकत होता. अनिल परब बंगल्यातला म्हणजे मातोश्रीचा जवळचा माणूस हे जगजाहीर आहे. त्याचे धागेदोरे ठाकरे कुटुंबापर्यंत जाणारच कारण उद्धव ठाकरे शिंकले तरी रुमाल अनिल परब द्यायचा. स्पॉट नानाचे दिवस फिरले, खूप उड्या मारत होता,’ असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या