fbpx

आनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघेंच्या हत्येचा कट रचल्याचे आणि त्यांचा मृत्यू रुग्णालयात झाल्याचे भासवण्यात आला असल्याचे गंभीर आरोप केले आहेत.त्यावरून आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.त्यांनी निलेश राणे यांना चांगलेच धारेवर धरले आहे.

यावेळी  बोलताना केदार दिघे म्हणाले, ‘आनंद दिघे यांच्याविषयी अनेकांच्या मनात आदराचे स्थान आहे.या आरोपांच्या पार्श्वभूमीवर कोणीही भावनांचा उद्रेक करु नये, तसेच आनंद दिघे हे महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असल्याने त्यांच्याविषयी विधान करताना प्रत्येकाने जबाबदारीचे भान ठेवावे, असंही ते म्हणाले.

नेमकं काय म्हणाले केदार दिघे ?

“दर पाच वर्षांनी निवडणुकीत आनंद दिघे यांच्या मृत्यूचा विषय उकरुन काढला जातो आणि निवडणुकीनंतर विषय संपुष्टात येतो. नीलेश राणे यांनी हे गंभीर आरोप का केले हे मलाही माहित नाही, पण जर त्यांच्याकडे यासंदर्भातील काही पुरावे असतील तर ते जनतेसमोर आणावेत.

 

1 Comment

Click here to post a comment