माझ्या कार्यकर्त्यांच्या अंगावर जो कुणी येईल त्याचा तिथंच बंदोबस्त केला जाईल – निलेश राणे

nilesh rane

पावस – उध्दव ठाकरे यांना ग्रामपंचायत कळत नाही. कोरोनाच्या काळात ते बाहेर फिरकले सुद्धा नाही. म्हणून विकास कामासाठी सेनेचे पालकमंत्री, आमदार, खासदार मातोश्रीवर लोटांगण घालतात. रत्नागिरी जिल्ह्यात विकासकामे झालीच नाहीत म्हणून रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांना ग्रामपंचायत निवडणूकीसाठी दारोदारी मत मागण्यासाठी फिरावं लागत आहे अशी टीका भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी केली.

नारायण राणे मंत्री असताना कधीच ग्रामपंचायत, आमदारकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले नाहीत. गावच म्हणायचं राणें साहेब तुम्ही गावाचा विकास जे काही केलं आहे ते तुम्हीच केलं आहात मग तुम्हालाच निवडून देऊ अस गावच सांगायच. चांगलं काम केलं तर चांगल्या कामाचा चांगलं कौतुक केलं जातं असे प्रतिपादन  निलेश राणे यांनी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत, पावस ग्रामपंचायत सावत्रिक निवडणूक २०२१ येथे केले.

ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर  रत्नागिरी तालुक्यातील नाचणे, भाट्ये, गोळप, पावस, नाखरे, डोर्ले, गावखडी या गावात गावभेटी घेऊन उमेदवार, प्रतिष्ठित ग्रामस्थ यांना निवडणूक अनुषंगाने मार्गदर्शन व सूचना दिल्या.राणें म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा दरडोई उत्पन्नात पाचव्या क्रमांकावर आहे तर रत्नागिरी जिल्हा तेवीसाव्या क्रमांकावर आहे. ही आपल्या जिल्ह्याची अवस्था बिकट आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी फक्त ३५ कोटी आहे तर  नियोजन प्लॅन २१७ कोटी आहे.

रत्नागिरीचे पालकमंत्री जिल्ह्यातुन गायब आहेत. ते मातोश्रीवर वाॅचमनची ड्युटी करतायत. जिल्हा परिषद दिवाळखोरीत गेली तरी या सेनेच्या मत्र्यांना काही फरक पडत नाही. फक्त त्याना टक्केवारी पाहिजे असते. सीओना ग्रामीण भागातील रस्त्याच्या दुरूस्ती बद्दल प्रश्न विचारले तर त्यांचं उत्तर पैसे नाहीत. ग्रामीण भागातील अवस्था खूप बिकट आहे. केसाला टोप लावायला, डांबर चोरायला ह्या मत्र्यांकडे पैसे आहेत मात्र जिल्ह्याचा विकासासाठी पैसे नाहीत ही जिल्ह्यासाठी लाजिरवाणी बाब आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १५ वर्षांत एकही कारखाना आणला नाही. बेरोजगारी वाढली. तरुण पिढी या सेनेने बरबाद केली आहे. उदय सामंतची पायाखालची वाळू घसरल्याने शिवसेनेत प्रवेश केला अन्यथा सामंत आमदार सुद्धा झाला नसता अशी जोरदार टीका राणें यांनी केली.

पालकमंत्री अनिल परब त्या कंगणाच्या विरोधात बोलत होते. मात्र परब यांची अनधिकृत बांधकाम आहेत. राज्य सरकारच्या विरोधात बोललं तर कधी प्रोटेक्शन काढून घेतायत, आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर केसेस टाकत आहेत. जिल्ह्यात दारुचे अड्डे बंद केले म्हणून माझ्या वर केसेस टाकले गेले. एकविसाव्या वर्षात पहिली केस घेतली मात्र कधी मी हरलो नाही एकच ध्यास घेतला जे काही करेन ते जनतेच्या समाज सेवेसाठी करीन. राणें साहेबांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहाशे बेडच हॉस्पिटल उभं केलं मात्र या उदय सामंतने रत्नागिरी जिल्ह्यात एकतरी हॉस्पिटल उभं करून दाखवावं. कोरोनाच्या काळात रत्नागिरी जिल्ह्याला केंद्र सरकारने मदत  केली मात्र सेनेच्या आमदार, खासदार, पालकमंत्री यांना एकही मदत राज्य सरकारमधून करता आली ही दुर्दैवी बाब आहे. निवडणूक जवळ आली मतदार संघातील जनतेला धमकवणे हे सेनेचे लोक करीत आहे. मात्र माझ्या कार्यकर्त्यांच्या अंगावर जो कुणी येईल त्याचा तिथंच बंदोबस्त केला जाईल असा थेट इशारा राणें यांनी दिला आहे.

रत्नागिरी तालुक्यात भाजपमय वातावरण आहे. शिवसेनेला हाणून पडायचं असेल तर होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूकित भाजपचा झेंडा फडकला पाहिजे. मगच आपल्या येणाऱ्या सगळ्या निवडणूका सहज जिंकता येतील. एकदा मला पाच वर्षांसाठी खासदार करा. या रत्नागिरी जिल्ह्याचा विकास कामाच्या बाबतीत कायापालट करून टाकीन. माझी तरुण पिढी वाया जाता कामा नये म्हणून मी नेहमीच मतदार संघात फिरत असतो. जनतेच्या समस्या जाणून घेऊन समाजसेवा करत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन उभे राहिले त्यामुळे तिथल्या स्थानिकाना रोजगार मिळाला असे राणें यांनी सांगितले. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या