मराठा आरक्षणाला पाठींबा द्या, अन्यथा आंबेडकरांना महाराष्ट्रात राहता येणार नाही : निलेश राणे

पुणे : मराठ्यांना आरक्षण मिळू नये किंवा त्याला विलंब लागावा म्हणून प्रकाश आंबेडकर प्रयत्न करत आहेत. अधूनमधुन आरक्षणाविरोधात वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करत आहेत. त्यांचा जर आरक्षणाला विरोध नसेल तर पाठिंबा द्यावा, अन्यथा महाराष्ट्रात राहता येणार नाही, असा इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे.ते पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

नेमकं काय म्हणाले निलेश राणे ?
प्रकाश आंबेडकरांचे एक वक्तव्य आलं होतं. राणे समितीच्या अहवालाचा बट्ट्याबोळ असं त्याचं वक्तव्य आलं होत. त्याच्या आधारावर मी बोलत आहे. राज्य सरकार आणि आयोगाच्या पातळीवर आरक्षणाचा विषय असताना आंबेडकरांनी यामध्ये उडी मारायची गरजच काय होती ? त्यांना आरक्षणाला पाठिंबा द्यावा लागेल, अन्यथा महाराष्ट्रात राहता येणार नाही. आम्ही भीक मागत नाही. आरक्षण हा आमचा हक्क आहे, प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला शिकवू नये.