सत्ता सोडायचीय पण डुं***त दम नाही; शिवसेनेच्या पोस्टरला नीलेश राणेंच प्रत्युत्तर

सध्या राज्यात शिवसेना विरुद्ध नारायण राणे अस पोस्टर युद्ध रंगल्याच दिसत आहे. काल नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर शिवसेनेकडून शेलकी भाषा वापरत पोस्टर लावण्यात आले होते. या पोस्टरला प्रत्युत्तर म्हणून माजी खासदार नीलेश राणेंनी एक पोस्टर ट्विट केले आहे. या पोस्टरमधून शिवसेनेला डिवचण्यासाठी टीका करताना नीलेश राणेंनीही पातळी सोडल्याच दिसत आहे.

कॉंग्रेसला रामराम केल्यानंतर आता नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु आहे. याच गोष्टीवर निशाना साधत काल वरळीमध्ये खालची भाषा वापरत शिवसेनेकडून पोस्टर लावण्यात आले होते. आता या टीकेला नीलेश राणेंनी त्याच भाषेत उत्तर दिले आहे. शिवसेनेकडून करण्यात आलेल्या खालच्या स्थराच्या भाषेचा वापर नीलेश यांनीही केला आहे. त्यामुळे एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर खासगीत बोलली जाणारी कमरेखालची भाषा सध्या पोस्टरवर झळकताना दिसत आहे.