‘उद्या जत्रेत जाऊन पाकीट माराल आणि सांगाल बाळासाहेबांची शपथ घेतो, पाकीट नाही मारलं’

nilesh rane

सिंधुदुर्ग : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी वाझेला १०० कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने देखील लेटरबॉम्ब टाकत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी खळबळ उडवून दिली आहे.

एनआयए कोर्टासमोर वाझेचे हस्तलिखित पत्र सादर केलं आहे. या पत्रात सचिन वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील खंडणी मागण्यासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप केला आहे.

सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रानंतर अडचणीत आलेले अनिल परब यांनी उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी माझे दैवत असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची व माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो की, सचिन वाझे यांच्या पत्रातील आरोप खोटे आहेत, असे भावनिक स्पष्टीकरण दिले.

दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून भाजपवर टीका केली आहे. अनिल परब यांनी बाळासाहेबांची शपथ घेऊन काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. खरा शिवसैनिक हा दुसरं काही करेल पण बाळासाहेब ठाकरेंची खोटी शपथ घेऊन काही करणार नाही,” असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी अत्यंत खरमरीत शब्दात टीका केली असून त्यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख देखील केला आहे. ‘कुत्र भीक घालत नाही तुझ्या शिवसैनिकांच्या शपथांवर. उद्या जत्रेत जाऊन पाकीट माराल आणि सांगाल बाळासाहेबांची शपथ घेतो पाकीट मी नाही मारलं तर पोलिसांनी सोडून द्यायचं का?? हीच शपथ कोर्टात घेतली तर जज हाथ पाय बांधून ६ महिन्याची पोलीस कस्टडी देतील. संज्या स्वतः बाईच्या लफड्यात अडकलाय.’ असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :