सिंधुदुर्ग : गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधित करत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आठ दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार आहे.
गेल्या १ वर्षांपासून कोरोनानं जगभरात थैमान घातलं आहे. या कालावधीत अनेकांना कोरोनाची लागण झाली तर काही जणांनी यामुळे आपले प्राणही गमावले. त्यातच आता राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्या आधीच अनेक राजकीय नेते विशेषतः महाविकास आघाडीतील मंत्री अचानक कोरोनाग्रस्त होऊ लागले आहेत.
यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘१४००० ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, महाराष्ट्रात आंदोलने झाली तेव्हा कोरोनाची आकडेवारी वाढली नाही मात्र अधिवेशनाच्या तोंडावर कोरोना वाढला? लॉकडाऊन च्या संकटात लोकांच्या नोकऱ्या, बँकेचे हफ्ते, लाईटबील घेऊनसुद्धा ठाकरे सरकारला अधिवेशनाला जायचं नाही म्हणून महाराष्ट्रात परत लॉकडाऊन !’ असा घणाघात निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमधून केली आहे.
१४००० ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, महाराष्ट्रात आंदोलने झाली तेव्हा कोरोनाची आकडेवारी वाढली नाही मात्र अधिवेशनाच्या तोंडावर कोरोना वाढला? Lockdownच्या संकटात लोकांच्या नोकऱ्या, बँकेचे हफ्ते, लाईटबील घेऊनसुद्धा ठाकरे सरकारला अधिवेशनाला जायचं नाही म्हणून महाराष्ट्रात परत Lockdown.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 22, 2021
महत्वाच्या बातम्या
- गिरीश महाजन सध्या फार लहान, त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याची गरज नाही – नाना पटोले
- जे दिशा बरोबर झाले आहे तेच पुजा बरोबर होणार असेल तर शक्ती कायदा काय चाटायचा आम्ही ? : करुणा मुंडे
- खासदार मोहन डेलकर यांच्या मृत्यूने खळबळ ; कोण होते खासदार मोहन डेलकर ?
- पेट्रोलचे नवे भाव, २५ ला पाव!
- इंधनदरवाढीला विरोध करत रॉबर्ट वाड्रा यांनी सायकलवरून गाठले ऑफीस