‘शिवजयंतीला शिवनेरीवर १४४ कलम लावणाऱ्या महाभकास आघाडीला आज कोरोनाची भिती वाटली नाही’

nilesh rane

सिंधुदुर्ग : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे चिंता व्यक्त होतेय. शिवजयंती दिनी देखील कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले होते. तर, शिवजन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर १४४ कलम लावण्यात आले होते. यानंतर रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लाईव्ह येत नागरिकांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी मास्क, सतत हात धुणे आणि शारीरिक अंतर राखणे यासह कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड हे पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर नॉट रिचेबल होते. मात्र, आज ते समोर आले असून पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड समर्थकांनी तुफान गर्दी केली असून कोरोनाच्या सगळ्या नियमांना पायदळी तुडवले आहे. बेकाबू गर्दीवर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला अशी परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळाली.पोलिसांचे आदेश झुगारत ५० जणांची परवानगी असताना हजारो समर्थकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. शिवसेनेचे कार्यकर्ते नेते हेच या गर्दीत मोठ्याप्रमाणावर दिसून आले. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

‘शिवजयंतीला शिवनेरीवर १४४ कलम लावणारे ठाकरे सरकारला पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयाच्या घेऱ्यात असलेले संजय राठोड अचानक बिळातून बाहेर आले आणि गर्दी करून फिरले त्यावेळी महाभकास आघाडीला कोरोनाची भिती वाटली नाही… ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना सगळं माफ आहे,’ अशी बोचरी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या