Nilesh Rane | मुंबई : सत्तांतर नंतर विरोधक आणि सत्ताधारी असा वाद तुफान पेटला आहे. विरोधक वारंवार टीका करताना दिसत आहे. तर आता दिवाळी सण आला असून सुद्धा आरोप-प्रत्यारोप काही थांबेना. याच पार्श्वभूमीवर भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं असून यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी एकेरी भाषेचा वापर केला आहे.
दिवाळी सणाच्या तोंडावर उद्धव ठाकरे गटाचे आमदार व पदाधिकारी राजकीय स्टेटमेंट देत बसलेत. अरे तुम्हाला जी नाटकं करायची आहेत ती दिवाळी नंतर करा, तुमचा उद्धव ठाकरे गेल्यानंतर दोन वर्षांनी लोकांना दिवाळी साजरी करण्याची संधी मिळाली आहे. प्रत्येक गोष्टीत राडारड कशाला, असं निलेश राणे म्हणाले आहे.
निलेश राणे यांचा ट्विटवाॅर –
निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी एक व्यंग चित्र असलेला एक फोटो पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर हल्ला केला आहे. त्या व्यंग चित्रामध्ये या व्यंगचित्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासमोर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या दिसत आहेत. एकीकडे भारत जोडो यात्रा दिसत आहे. या व्यंगचित्रात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हेही आहेत. ते आपल्या वडिलांना म्हणजेच उद्धव ठाकरे यांना ‘ बाबा इथलं झालं असेल तर तिकडे मुजरा घालायला चला’, असं म्हणत आहेत.
उद्धव ठाकरेंचा गट आणि शिवसेना कुठं राहिली आहे, ५६ आमदारांतील ५ ते ६ आमदार शिवसेनेकडे राहिले आहेत, ते सुद्धा लवकरच प्रवेश करतील, ठाकरे सोडून महाराष्ट्र आणि देशात बरचं काही असून त्यांचं राजकारण ‘मातोश्री’पुरतं चालतं. बाळासाहेब ठाकरेंच्या काळात ते माझे सहकारी होते. तेव्हा असे नव्हते, असं नारायण राणे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Ambadas Danve | “…म्हणून शिंदे गट, भाजप, मनसे महापालिकेसाठी एकत्र येतील”; अंबादास दानवेंनी बोचरी टीका
- Narayan Rane | “उद्धव ठाकरेंचं राजकारण ‘मातोश्री’पुरतं चालतं म्हणून…”, नारायण राणेंची बोचरी टीका
- Girish Mahajan | मनसे भाजप युती होणार ?, गिरीश महाजन यांनी केलं स्पष्ट म्हणाले…
- Girish Mahajan | मिलींद नार्वेकरांनी अमित शहांना शुभेच्छा देताच गिरीश महाजन म्हणाले – “शिवसेनेत नाराज…”
- Ajit Pawar | राज ठाकरे, शिंदे, फडणवीस भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…