अशोक चव्हाण असेपर्यंत काँग्रेसला राज्यात अच्छे दिन येणार नाही,निलेश राणेंनी डागली तोफ

टीम महाराष्ट्र देशा- ‘देशात काँग्रेस जोरात आहे, पण राज्यात काँग्रेस अपयशी ठरली आहे. अशोक चव्हाण असेपर्यंत काँग्रेसला राज्यात अच्छे दिन येणार नाही’, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवरुन अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने भाजपाला धक्का दिला आहे. छत्तीसगड, राजस्थानमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले असून मध्य प्रदेशातही काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या पार्श्वभूमीवर राणे ट्विटरवरून तोफ डागली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे या ट्विटमध्ये ?

‘देशात काँग्रेस जोरात आहे. पण महाराष्ट्रात अहमदनगरमध्ये शिवसेना, धुळेमध्ये भाजपा, नांदेड (लोहा) नगर पंचायतमध्ये भाजपाची सत्ता आली आहे. अशोक चव्हाण पूर्ण अपयशी ठरले असून काँग्रेसला देशात दिवस चांगले आलेत पण महाराष्ट्रात अशोक चव्हाण असेपर्यंत राज्यात काँग्रेसला अच्छे दिन येणार नाही’.

“आदित्य ठाकरे मूर्ख आहे” निलेश राणेंची खरमरीत टीका

पराभूतांना विधानसभेसाठी पुन्हा उमेदवारी मिळणार नाही,अशोक चव्हाणांची मोठी घोषणा

भाजप-शिवसेनेचे भांडण म्हणजे ‘वरून तमाशा,आतून कीर्तन’ ! – अशोक चव्हाण

“धनंजय मुंडेनां बाद करण्यासाठी राष्ट्रवादीच्याच नेत्यांची खेळी”