…तरी पण आपण म्हणायचं महाराष्ट्र सरकार चांगलं काम करतय’

Nilesh Rane

टीम महाराष्ट्र देशा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवेळी राज्यातील जनतेशी सातत्याने संवाद साधत आहेत. तसेच उद्धव ठाकरेंच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईचे सोशल मीडियावरही कौतुक करण्यात येत आहे.

प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी उद्धव ठाकरेंच जाहीर कौतुक केले होते. ‘उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने कोरोना संकट हाताळत आहे, ते कौतुकास्पद आहे. माझा सॅल्युट,’असे ट्विट जावेद अख्तर यांनी केले होते.

परंतु देशासह राज्यभरात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वेगानं वाढत आहे. राज्यात रविवारी ११३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ७४८वर पोहचली आहे. तसचे कोरोनामुळे राज्यभरात एकूण ४६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर देशातील मृतांचा आकडा ८९ वर पोहचला आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू महाराष्ट्रात झाला आहे. यावर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी सरकारला टोला लगावला आहे.

देशाच्या तुलनेत ५० टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाला आहे. परंतु तरीही आपण म्हणायचं महाराष्ट्र सरकार चांगल काम करतय असं ट्विट करत निलेश राणे यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

हेही पहा –