मुंबई:राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक तुरुंगात असताना त्यांचा मंत्रिमंडळ निर्णय जाहीर केल्याने भाजप नेते निलेश राणे (nilesh rane) यांनी ट्वीट करत ठाकरे सरकारला निशाण्यावर धरले आहे. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ निर्णयाचा फोटो ट्विटरवर शेअर करत मविआ सरकारला चांगलेच सुनावले आहे.
“काय शोकांतिका आहे… हे बघून हसावं की रडावं कळत नाही. दाऊदच्या हस्तका सोबत व्यवहार केल्या प्रकरणात नवाब मलिक जेलमध्ये आहे, तरीही मंत्री आहे आणि जेलमध्ये बसून मंत्री मंडळाच्या निर्णयावर महाराष्ट्र शासनाने मंत्री नवाब मलिक यांचा निर्णय जाहीर केलाय.”, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.
काय शोकांतिका आहे… हे बघून हसावं की रडावं कळत नाही. दाऊदच्या हस्तका सोबत व्यवहार केल्या प्रकरणात नवाब मलिक जेलमध्ये आहे तरीही मंत्री आहे आणि जेलमध्ये बसून मंत्री मंडळाच्या निर्णयावर महाराष्ट्र शासनाने मंत्री नवाब मलिक याचा निर्णय जाहीर केलाय. pic.twitter.com/1G6M9c2AQK
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 29, 2022
दरम्यान २८ एप्रिल २०२२ रोजी हा मंत्रिमंडळ निर्णय जाहीर करण्यात आला. येरवडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी पदनिर्मिती करण्यास मान्यता दिल्याचा हा मंत्रिमंडळ निर्णय असून यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा फोटो आहे. हाच फोटो ट्वीट करत निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या:
- “…तर त्याचे पालन महाराष्ट्रात का होत नाही?”, अतुल भातखळकरांचा संजय राऊतांना सवाल
- “मोदींकडून महाराष्ट्राला सावत्रपणाची वागणूक”, संजय राऊतांचा हल्लाबोल
- राणा दाम्पत्य यांच्या अडचणीत वाढ; जामिनाला पोलिसांकडून कडाडून विरोध
- “उत्तर प्रदेशात भोंगे उतरवण्यात आलेले नसून तिथे…”, योगी सरकारने केलेल्या ‘त्या’ कारवाईवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया!
- अकलेचा आणि तुमचा काडीचा तरी संबंध आहे का?; मुरलीधर मोहोळ यांचा संजय राऊतांवर निशाणा