मुंबई: कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांना अगोदर शिवसेना प्रवेश तरच राज्यसभेची संधी अशी ऑफर देण्यात आली होती, मात्र संभाजीराजेंनी ही ऑफर नाकारली होती. आता राज्यसभेच्या सहाव्या जागेवर कोल्हापूरचे शिवसेना नेते संजय पवार यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. यावरूनच भाजप नेते निलेश राणे (nilesh rane) यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
“राज्यसभेच्या ६व्या जागेसाठी शिवसेनेने कोल्हापूरचे संजय पवार यांना उमेदवारी दिली. छत्रपती संभाजी मातोश्रीवर गेले नाहीत म्हणून त्यांना उमेदवारी नाही, हा राजघराण्याचा अपमान आहेच पण शिवसेना किती खालच्या थराला जाऊन घाणेरडे राजकारण करणारा पक्ष आहे हे सुद्धा महाराष्ट्राने पाहिलं.”, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.
राज्यसभेच्या ६व्या जागेसाठी शिवसेनेने कोल्हापूरचे संजय पवार यांना उमेदवारी दिली. छत्रपती संभाजी मातोश्रीवर गेले नाहीत म्हणून त्यांना उमेदवारी नाही, हा राजघराण्याचा अपमान आहेच पण शिवसेना किती खालच्या थराला जाऊन घाणेरडे राजकारण करणारा पक्ष आहे हे सुद्धा महाराष्ट्राने पाहिलं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 24, 2022
दरम्यान संजय पवार यांचे नाव फायनल आहे. संजय पवार हा सेनेचा मावळा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असून अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. मात्र संभाजीराजे यांना समर्थन न दिल्याने आता शिवसेनेवर टीका केली जात असल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…या पायंड्याला पंतप्रधान मोदींनी विरोध करायला हवा”, संजय राऊतांची मागणी
- राजीव गांधींच्या खुन्यांचा सन्मान करून एम. के. स्टॅलिन यांनी काय साध्य केले?; ‘शिवसेने’चा सवाल
- देवेंद्र फडणवीसांच्या ‘जलआक्रोश’ मोर्चावर सचिन सावंत यांची टीका; गुजरातचा हवाला देत म्हणाले…
- IPL 2022 GT vs RR Qualifier 1 : गुजरात फायनलमध्ये..! मिलरच्या ‘किलर’ खेळीमुळं राजस्थानला पराभवाचा धक्का
- IPL 2022 GT vs RR Qualifier 1 : नशीबवान जोस बटलर..! फायनल गाठण्यासाठी गुजरातसमोर १८९ धावांचं लक्ष्य
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<