मुंबई: महाविकास सरकारवर सध्या ‘करा किंवा मरा’ अशी परिस्थिती ओढवली आहे. बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटात ४० हून अधिक शिवसेना नेते असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच या आमदारांनी मविआ सरकारचा पाठिंबाही काढून घेतला आहे. या परिस्थितीमुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना याची दाखल घेण्याची मागणी केली असून राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात पत्र लिहिले आहे.
महाविकास आघाडी सरकारला उद्याच अर्थात ३० जून रोजी बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. यावरूनच भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी मविआ सरकारला टोला लगावला आहे. “हा संपला तो संपला म्हणणारे स्वतःच संपले.”, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे.
हा संपला तो संपला म्हणणारे स्वतःच संपले.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 29, 2022
दरम्यान शिवसेनेने बहुमताच्या निर्णयाविरोधात थेट सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. सदरील आदेशाच्या विरोधातील शिवसेनेच्या याचिकेवर आज पाच वाजता सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर आजच सुनावणी होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. त्यातच तुरुंगात बंद असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी उद्या महाराष्ट्रातील फ्लोर टेस्टला उपस्थित राहण्याची परवानगी मागितली आहे. सुप्रीम कोर्टाने आज संध्याकाळी त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Amol Mitkari : “बहुमत चाचणीचा आदेश एका रात्रीत कसा निघतो, नक्कीच…” ; अमोल मिटकरींचा राज्यपालांना खोचक सवाल
- Supreme Court : मलिक-देशमुखांची कोर्टाकडे फ्लोर टेस्टला उपस्थित राहण्याची मागणी; आज होणार सुनावणी
- IRE vs IND : आर्यलंडवर क्लीन स्वीप..! भारताचा कॅप्टन हार्दिक पंड्या म्हणतो, ‘‘मला माझ्यावर…”
- Mahesh Babu : तेलगू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार महेश बाबूने घेतली बिल गेट्सची भेट ; पाहा PHOTO
- Sanjay Raut : भाजपकडून राज्यघटनेच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत – संजय राऊत
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<