मुंबई: राज्यात सध्या नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. एका प्रचार सभेमध्ये शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी त्यांच्या मतदार संघातील रस्त्यांची तुलना बॉलिवूडची अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गालाशी केली आहे. ‘माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केले आहेत. तुम्ही काय महाराष्ट्राला शिकवता?’, असे पाटील म्हणाले होते. दरम्यान, पाटलांच्या या टिकेवरूनच आता भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी टीका केली आहे.
‘जूलाब पाटील परत ओकला, म्हणे मतदारसंघाचे रस्ते हेमा मालिनीच्या गाला सारखे आहे. हा माणूस कधीच शुद्धीत नसतो तरी पण नशेत असो किंव्हा शुद्धीत असो महाराष्ट्रात व देशात हे खपवून घेतलं जाणार नाही.’ असे ट्वीट करत निलेश राणे यांनी शिवसेनेला गंभीर इशारा दिला आहे.
जूलाब पाटील परत ओकला, म्हणे मतदारसंघाचे रस्ते हेमा मालिनीच्या गाला सारखे आहे. हा माणूस कधीच शुद्धीत नसतो तरी पण नशेत असो किंव्हा शुद्धीत असो महाराष्ट्रात व देशात हे खपवून घेतलं जाणार नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 20, 2021
दरम्यान यावरच भाजपच्या चित्रा वाघ यांनीही संताप व्य्कीत केला आहे. ‘शिवीगाळ करणारे संजय राऊत उजळ माथ्यानं फिरताहेत, गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसताहेत. पण पोलिस यंत्रणांना यांत महिलांचा विनयभंग दिसत नाही. मी गृहमंत्र्यांना आवाहन करतेय, तात्काळ गुन्हा दाखल करा. नाहीतर गाल पाहणा-यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.’ असा संताप चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ”दोन महिन्यांपासून पठ्ठ्या कुठंय?”; दानवेंची मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत टीका
- ‘भाजपावाल्यांनो, बंगळुरूचे राजभवन गाठा, बोम्मईंचे सरकार आता घालवाच!’
- शिवरायांचा अपमान ही किरकोळ किंवा छोटी घटना असेल तर मोठे काय? शिवसेनेचा सवाल
- ”जयंतराव, हा शहाणपणा राजू नवघरे आणि नवाब मलिकांना सांगा”
- …पण ह्या राष्ट्रवादी आमदार राजू नवघरेचं काय करायचं? नितेश राणेंचा टोला