मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठन करण्याचा इशारा दिला होता. यानंतर शिवसैनिक मोठ्या संख्येने मातोश्रीबाहेर जमले होते. त्यात एका ८० वर्षीय आजींचाही समावेश होता. यावेळी त्यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे बघायला मिळाले. तद्पश्चात २४ एप्रिल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब या आजींची भेट घेण्यासाठी शिवडीमधील त्यांच्या घरी पोहोचले. दरम्यान, या मुद्द्यावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे.
यासंदर्भात निलेश राणे यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘ज्या आजीच्या घरी मुख्यमंत्री गेले त्या घरात डोक्यावर अनधिकृत अर्धा माळा बनवलेला मुख्यमंत्र्याला व बीएमसीला दिसला नाही. दुसऱ्यांची घरं तोडायला निघालात पण नियतीने पलटी मारल्यावर तुमच्या घराचं काय होणार? तुमच्या घरात तसा कोण संघर्ष करणारा शिल्लक पण राहिला नाही, पळून जाल मुंबई सोडून’, असा घणाघात निलेश राणेंनी केला आहे.
ज्या आजीच्या घरी मुख्यमंत्री गेले त्या घरात डोक्यावर अनधिकृत अर्धा माळा बनवलेला मुख्यमंत्र्याला व बीएमसीला दिसला नाही. दुसऱ्यांची घरं तोडायला निघालात पण नियतीने पलटी मारल्यावर तुमच्या घराचं काय होणार? तुमच्या घरात तसा कोण संघर्ष करणारा शिल्लक पण राहिला नाही, पळून जाल मुंबई सोडून. pic.twitter.com/UeWjGDoHAV
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 26, 2022
दरम्यान, ‘माणसाचं वय कितीही वाढलं, तरी तो मनानं तरुण हवा, असे बाळासाहेब म्हणायचे. या आजी अजूनही तरुण आहेत. वय वाढलं पण त्या अजूनही युवासेनेच्याच कार्यकर्त्या आहेत’, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिंदे आजींचे कौतुक केले.
महत्वाच्या बातम्या:
- मंदिरावर भोंगे लावल्यानंतर पोलिसांकडून त्रास, भाजप आमदाराचा आरोप!
- IPL 2022 : ८ सामन्यांमध्ये ६ पराभव..! स्पर्धेबाहेर गेलाय का CSK संघ? नक्की वाचा!
- “एवढी लुच्चाई फक्त ठाकरे सरकारच करू शकत”- किरीट सोमय्या
- “कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर…”, गृहमंत्र्यांचा इशारा
- सचिनच्या लाडक्या लेकीची ‘नवी’ इनिंग? सारा तेंडुलकरविषयी ‘महत्त्वाची’ बातमी आली समोर!